Sentence and Types of sentences

Sentences and types in Marathi | English grammar

Sentence म्हणजे काय?

English Grammar च मुळात या प्रश्नापासून सुरु होतं, Sentence म्हणजे काय?

So, चला बघूया, 

Sentence म्हणजे नक्की काय आणि Types of sentences.

मित्रांनो आपण जेव्हा कुठल्याही भाषेत बोलतो तेव्हा actually आपण त्या भाषेतल्या शब्दांचा आधार घेतो. जसं की, 

मला इंग्लिश भाषा शिकायची आहे. 

आता इथे ‘मला’ एक शब्द आहे, ‘भाषा’ हा दुसरा शब्द आहे, ‘शिकायची’,’आहे’,’इंग्लिश’ हे सुद्धा काय झाले शब्द.

So, basically आपण शब्द समूह वापरत असतो. Correct?

आणि याच शब्दांच्या समूहाला म्हटलं जातं  “वाक्य”. वाक्य म्हणजेच Sentence. 

पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजे शब्दांच्या  कुठल्याही  समूहाला Sentence म्हणता येणार नाही. 

For example :

Is name Dipti my.

याला आपण वाक्य म्हणू शकत नाही. कारण या शब्दांच्या समूहाचा काहीच अर्थ लागत नाही. 

म्हणजेच शब्दांची मांडणी सुसंगत असणं गरजेचं आहे. तरच त्या शब्द-समूहाला आपण वाक्य/sentence म्हणू शकतो. 

 

Understood?

अजून एक उदाहरण बघूया. 

 

सर्वांच्याच तर बालपणात शाळा सुखाचा काळ नसती बालपणाचा झाला असता जर. 

हा एक शब्द समूह आहे. 

 

बालपणात जर शाळा नसती तर सर्वांच्याच बालपणाचा काळ सुखाचा झाला असता. 

 हा ही एक शब्द समूह आहे. 

 

(हे वाक्य पु. ल. देशपांडे यांच्या पुरचुंडी या पुस्तकातील आहे.)

 

आणि या दोन्ही शब्द समूहांमधील शब्द सुद्धा सारखे आहेत फक्त त्यांचा क्रम सारखा नाही. 

शब्द जरी तेच असले तरी फक्त दुसऱ्या शब्दसमूहाचा अर्थ लागतो. आणि शब्दांची मांडणी सुसंगत नसल्यामुळे पहिल्या शब्द समूहाचाअर्थ लागत नाही. म्हणूनच या दोन शब्द समूहांपैकी आपण फक्त दुसऱ्या शब्द समूहाला वाक्य म्हणजेच sentence म्हणू शकतो. पहिल्या शब्द समूहाला नाही. 

 

So, Sentence म्हणजे असे वाक्य ज्याचा काहीतरी अर्थ लागतो. 

 

A group of words that make complete sense is called a “sentence.”

(एखाद्या शब्दाला किंवा शब्दांच्या सुसंगत मांडणीमुळे त्या शब्द-समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.)

 

Types of Sentences

Sentences चे (by their purpose) मुख्यतः ४ types म्हणजेच प्रकार आहेत. (वाक्यांचे त्यांच्या अर्थानुसार (by their purspose)आणि रचनेनुसार(by their structure) वेगवेगळे प्रकार पडतात.)

Declarative, exclamatory, interrogatory, and imperative sentences.

1. Declarative sentence (डिक्लेरेटिव्ह सेन्टेन्स)

Declarative sentences म्हणजे असे sentences जे फक्त एक statement असतात. म्हणजेच अशी वाक्य ज्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह नसतं. केवळ एक पूर्णविराम असतो. 

For example,

  • Every morning I go to the gym. (मी रोज सकाळी जिम ला जातो.)
  • I am fond of playing cricket. (मला क्रिकेट खेळायला आवडतं.) 
  • I am feeling bored, so I am going home. (मला कंटाळा आला आहे,म्हणून मी घरी जातोय.) 

2. Exclamatory sentence (एक्सक्लॅमेटरी सेन्टेन्स)

Exclamatory sentence म्हणजे असे statements जे खूप strong feelings म्हणजेच emotions व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा आपल्याला खूप राग येतो किंवा खूप आनंद झालेला असतो किंवा आपल्याला जेव्हा खूप excitement वाटत असते तेव्हा जी वाक्य आपण वापरतो ती असतात exclamatory sentences. 

  • Wow! What a beautiful dress! (वाह! काय सुंदर ड्रेस आहे!)
  • Oh god! You startled me! (देवा! दचकवलंस मला!)
  • How careless you are! (किती निष्काळजी आहेस तू!)

So have you observed one important thing here? (तुम्ही इथे एका महत्वाच्या गोष्टीचं निरीक्षण केलं का?) 

These sentences end with an exclamation mark, (या वाक्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं.) 

Let’s look into the next type of sentence.

(Sentences चा पुढचा प्रकार बघूया.) 

3. Interrogative sentences (इन्- ट-रॉ-गेटिव्ह सेन्टेन्स)

Interrogative sentences म्हणजे प्रश्नार्थक वाक्य 

म्हणजेच ज्या वाक्यांनी आपण प्रश्न विचारतो अशी वाक्य. 

  • Will you marry me? (माझ्याशी लग्न करशील का?)
  • Where is my bag? (माझी पिशवी कुठे आहे?)
  • What kind of music do you like? (तुला कुठल्या प्रकारचं संगीत आवडतं?) 

 

(Note: interrogate (इन्ˌटेरˈगेइट्) या शब्दाचा अर्थ आहे खूप प्रश्न विचारणे.)

4. Imperative sentence (इम्पेरेटिव्ह सेन्टेन्स)

Imperative sentences ही आज्ञा किंवा सूचना देण्यासाठी, ताकीद देण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी वापरली जातात. 

  • Turn left at the roundabout. (चौकातून डावीकडे वळा – सूचना) 
  • Stop talking! (बोलणं थांबवा! – ताकीद वजा सूचना) 
  • Don’t talk to me like that. (माझ्याशी असं बोलू नकोस – ताकीद) 
  • Please get me a glass of water. (कृपया मला एक पेला पाणी दे – विनंती)  

सरावासाठी आपण अजून काही उदाहरणं बघूया.

Declarative Sentences:

  • I like cooking. (मला cooking आवडतं.)
  • He is 56 years old. (तो ५६ वर्षांचा आहे.)
  • My shoes are white. (माझे शूज पांढरे आहेत.)
  • He is an experienced teacher. (तो एक अनुभवी शिक्षक आहे.)
  • Gauri is my new classmate. (गौरी माझी नवीन वर्गमैत्रीण आहे.
  • There are hundreds of people in the cinema hall. (चित्रपट गृहामध्ये शेकडो लोक आहेत.)

 

Exclamatory Sentences:

  • That’s great news! (खूपच मस्त बातमी आहे!)
  • How beautiful this village is! (हे गाव किती सुंदर आहे!)
  • Oh no! It’s raining! (अरे देवा! पाऊस पडतोय!)
  • What a coincidence! (काय योगायोग आहे हा!)
  • What a liar you are! (किती खोटारडी आहेस तू!)
  • It’s really nice to meet you! (तुम्हाला भेटून खूप छान वाटलं!)

 

Interrogative sentences:

  • What do you want to eat today? (तुला आज काय खायचंय?)
  • Do you like tea? (तुला चहा आवडतो का?)
  • Are you fine? (बरा आहेस ना?)
  • Does she play guitar? ( ती गिटार वाजवते का?)
  • Should I go to the bank? ( मी बँकेत जायला हवं का?)
  • Where do you stay? (तुम्ही कुठे राहता?)

 

Imperative sentences :

  • Catch this. 
  • Please join us for lunch.
  • Pay your fees by Monday.
  • Do not open the door.
  • Be there at 6.
  • Hand me that spoon.
  • Get this lady a glass of water.