Transitive verbs and Intransitive verbs :

(सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे)

हा topic व्यवस्थित कळण्यासाठी english grammar मधील Verb, Subject, Object या basic गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 

 

Verb– Verb म्हणजे क्रियापद. वाक्यातील ज्या शब्दाने क्रिया दाखवली जाते असा शब्द. म्हणजेच वाक्यातील क्रियावाचक शब्दाला Verb असं म्हणतात.  

Subject– वाक्यातील कर्त्याला इंग्रजी मध्ये subject असं संबोधलं जातं. म्हणजेच वाक्यातील मुख्य क्रिया कोणी केली हे दाखवणारा शब्द म्हणजे subject.  

Object– Object म्हणजे वाक्यातील कर्म. वाक्यातील क्रिया ज्या व्यक्तीवर किंवा वस्तू वर घडते अश्या शब्दाला object असं संबोधलं जातं. क्रियापदाला ‘काय(what)’ हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं ते आहे वाक्यातील object(Direct Object). बरेचदा ‘कोणाला(whom) हा प्रश्न विचारल्यावरही वाक्यातील object(Indirect Object)’ कळतो.  

For example,

  1. I love ice cream.

           मला आईस्क्रिम आवडते. 

या वाक्यामध्ये आवडण्याची क्रिया घडत आहे. म्हणूनच ‘आवडते’ म्हणजेच ‘love’ हा शब्द या वाक्यातील Verb आहे. 

हि क्रिया कोणाकडून घडतेय? माझ्याकडून. म्हणून ‘I’ हे या वाक्यातील कर्ता म्हणजेच Subject आहे. 

मला ‘काय’ आवडते या प्रश्नाचं उत्तर आहे ‘ice cream’. म्हणून ‘ice cream’ हे आहे वाक्यातील object.

 

अजून काही उदाहरणं बघूया. 

        2. Gauri bought a new mobile.

           गौरीने नवीन मोबाइल फोन विकत घेतला. 

या वाक्यातील Verb आहे-bought(विकत घेतला) कारण येथे विकत घेण्याची क्रिया घडत आहे. 

Gauri(गौरी) आहे या वाक्यातील कर्ता म्हणजेच subject. 

आणि गौरीने ‘काय’ विकत घेतला? नवीन मोबाइल. म्हणूनच ‘a new mobile’ हे आहे वाक्यातील कर्म म्हणजेच object.

         3. Utkarsha gave me chocolate.

           (उत्कर्षाने मला चॉकलेट दिले. )

               Verb: Give

               Subject: Utkarsha

               Object: chocolate

         4. He called his brother.

          (त्याने त्याच्या भावाला बोलावले. )

          या वाक्यातल्या क्रियापदाच्या ‘काय’ हा प्रश्न विचारल्यास आपल्याला उत्तर मिळत नाही. पण ‘कोणाला(whom) हा प्रश्न विचारल्यावर ‘त्याच्या भावाला’ हे उत्तर आपल्याला मिळते. म्हणूनच या वाक्यामध्ये ‘his brother’ हे object आहे. 

Transitive Verb म्हणजे नक्की काय?

Transitive Verb या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे “सकर्मक क्रियापद’ म्हणजेच असे क्रियापद ज्याला कर्माची गरज असते. 

काही वाक्यांमध्ये कर्म म्हणजेच object जर उपस्थित नसेल तर त्या वाक्याचा काहीही अर्थबोध होत नाही जसे की-

  1. Please bring (कृपया आण) 
  2. She found (तिला सापडले) 
  3. The hunter killed (शिकाऱ्याने मारले) 
  4. I sent (मी पाठवले)

या वाक्यांमध्ये object नसल्यामुळे या वाक्यातून नक्की काय म्हणायचंय ते कळत नाही. अश्या वाक्यांमधील क्रियापदांना Transitive Verb असं म्हटलं जातं.

पण जर याच वाक्यांमध्ये objects असतील तर या वाक्यांचा अर्थबोध होईल. 

जसे की-

Please bring a glass of water. (कृपया एक पेला पाणी आण) 

She found her lost pen. (तिला तिचं हरवलेलं पेन सापडलं) 

The hunter killed a lion. (शिकाऱ्याने एका सिंहला मारले) 

I sent a text message. (मी एक text मेसेज पाठवला)

 

म्हणजेच या सर्व वाक्यांमधल्या क्रियापदांचा अर्थ बोध होण्यासाठी object लिहावंच लागले. 

म्हणून bring,find(found),kill(killed), आणि send(sent) हे Transitive Verbs आहेत. 

So, transitive verbs are actions that require an object to receive the action. (to add meaning to the sentence.)

आता आपण बघूया Intransitive Verb म्हणजे नक्की काय?
  1.  She laughed. (ती हसली) 
  2. Her baby smiled. (बाळाने स्मितहास्य केले)
  3. The sun shines. (सूर्य तळपतो)
  4. The kite flies. (पतंग उडतो) 
  5. The train arrived. (ट्रेन आली)

या सर्व वाक्यांमध्ये object म्हणजेच कर्म उपस्थित नाही. तरीदेखील या वाक्यांचा पर्यायाने त्यातल्या क्रियापदांचा पूर्ण अर्थबोध होतो. म्हणून अशी क्रियापदे ज्यांचा अर्थबोध होण्यासाठी object ची गरज नसते, अश्या क्रियापदांना म्हणजेच Verbs ला Intransitive Verbs असं म्हटलं जातं. 

So the definition of intransitive verbs can be written like this:

Intransitive verbs are those actions that don’t require an object to receive the action.

Note: काही क्रियापदे ही Transitive आणि Intransitive दोन्ही प्रकारे वापरता येतात. 

 

I ate rice. (मी भात खाल्ला.)

I ate. (मी खाल्ला.)

पहिल्या वाक्यामध्ये ‘मी काय खाल्ला?’ असं विचारल्यावर “भात” हे उत्तर मिळतं त्यामुळेया उदाहरणात “eat’ हे transitive verb आहे. पण दुसऱ्या वाक्यात “eat” हे क्रियापद Intransitive आहे. कारण “I ate” या वाक्यात object नसूनही वाक्य अर्थपूर्ण आहे. 

अजून काही उदाहरणं बघूया जिथे क्रियापद म्हणजेच verb transitive आहे की Intransitive हे objects च्या availability वरून ठरतं  

Verb 

Transitive 

Intransitive 

Eat

I ate rice. (मी भात खाल्ला.)

I ate. (मी खाल्ला.)

Read

She is reading a novel. (ती कादंबरी वाचत आहे.) 

She is reading. (ती वाचत आहे.)

Play

The children are playing cricket. (मुले क्रिकेट खेळात आहेत.) 

The children are playing. (मुले खेळात आहेत)

Break

You broke the vase.

The vase broke.



 काही Verbs  जे Transitive आणि Intransitive दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकतात.  

Open (उघडणे)

Speak (बोलणे)

Close (बंद करणे)

Cancel (रद्द करणे) 

Start (सुरुवात करणे)

Agree (सहमत असणे)

Stop (थांबवणे)

Count (मोजणे)

Continue (चालू ठेवणे)

Finish (संपणे)

Boil (उकळणे)

Return (परतणे)

Cook (शिजवणे)

Sing (गाणे)

Eat (खाणे)

Drive (गाडी चालवणे)

Read (वाचणे)

Get (मिळणे/आणणे/कळणे) 

Live (जगणे)

Run (धावणे/चालवणे)