English Tenses and types

Tenses and types in Marathi | काळ व काळाचे प्रकार

बरेच जण इंग्लिश काळ किंवा Tense शिकायचं म्हटलं, की एकतर किचकट व्याकरण शिकायचं म्हणून आधीच चिंतीत होतात; किंवा सरळ ते शिकण्यापासून परावृत्त होतात. पण तुम्ही खूपदा ऐकलं असेल आणि बऱ्याच अंशी ते खरं देखील आहे; ते म्हणजे व्याकरण हे भाषेचा पाया आहे आणि काळ हा व्याकरणाचा पाया आहे. अगदी कुठलही वाक्य असो, पण त्यात काळ हा असतोच.

जर तुम्ही परदेशात अस्खलित इंग्लिश बोलणाऱ्या मूळ रहिवाशांना विचारलं तर १०० पैकी अगदीच व्यक्ती तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने काळाची माहिती देईल; तेही तुम्ही भाग्यवान असाल तर! पण बाकी ९९ जणांना ‘continuous past’, ‘present perfect tense’ याविषयी फार काही सांगता येणार नाही. पण तरीही ते सगळेच प्रभावी पणे इंग्लिश बोलू शकतात आणि संवाद साधू शकतात

अर्थात स्पर्धापरीक्षेसाठी काळांची नावं शिकणं महत्वाचं नक्कीच आहे. पण त्यात वेडे होऊन जाऊ नका. त्या मूळ भाषिकांसारखे व्हा! उत्स्फूर्तपणे बोला!

या लेखात आपण मुख्य इंग्लिश काळ किंवा Tense आणि त्याचे १२ उपप्रकार शिकणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने.

**** महत्वाची टीपकाळांच्या नावांनी गांगरून जाऊ नका, तर सुरुवातीला उदाहरणांचा जाणीवपूर्वक अभ्यास करा. उदाहरणं आणि वाक्य लिहिण्याची पद्धत समजून घ्यायचा प्रयत्न करा!

 

Present

Past

Future

Simple

I write

I wrote

I will write

Continuous

I am writing

I was writing

I will be writing

Perfect

I have written

I had written

I will have written

Perfect Continuous

I have been writing

I had been writing

I will have been writing

What are the types of tenses featured image

Present Tense किंवा वर्तमानकाळ

1. Present Simple Tense - साधा वर्तमानकाळ​

सामान्य क्रिया, सद्यपरिस्थिती किंवा वर्तमानकाळात घडणारी क्रिया दर्शवण्यासाठी आपण हा काळ वापरतो. जसे –  

Peter is an entrepreneur. 

Kids ask too many questions.

My son loves football.

My friend lives in Australia.

वरील वाक्यांमध्ये दिलेली विधाने कुठल्याही वेळी सांगितली तरीही त्या विधानांचा अर्थ किंवा काळ बदलू शकणार नाही. जसं कीसूर्य पूर्वेला उगवतो”. तो काल, आज आणि उद्याही पूर्वेलाच उगवणार. म्हणूनसूर्य पूर्वेला उगवतोहे वाक्य Present simple tense मधील आहे.

2. Present Continuous Tense - चालू वर्तमानकाळ

जेव्हा एखादी क्रिया वर्तमानकाळात घडत असेल आणि ती पूर्ण झाली नसेल तर त्या क्रियेला आपण Present continuous tense मधील क्रिया म्हणतो. जसे –  

My mother is making pancakes for us.

Kids are playing in the garden.

Grandma is watching her favourite serial.

His neighbour’s dog is barking.

वरील वाक्यांमध्ये क्रिया अजून घडत आहे. ती घडून पूर्ण झालेली नाही. नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, present continuous tense मध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी ing असते. आणि मुख्य क्रियापदाच्या आधी is / are (to be चा वर्तमानकाळ) असते.

3. Present Perfect Tense - पूर्ण वर्तमानकाळ​

एखादी घटना किंवा क्रिया भूतकाळात सुरु होऊन वर्तमानकाळात पूर्ण झाली की आपण तिला पूर्ण वर्तमानकाळातील क्रिया म्हणू शकतो. या प्रकारच्या वाक्यांमध्ये दोन्ही काळांचा संबंध असल्यामुळे present perfect मधील वाक्य तुम्हाला past tense किंवा भूतकाळातील वाक्यासारखे वाटू शकते. खालील उदाहरणे पहा –  

Martin has picked up his daughter from school. 

I have eaten mango.

Students have completed their homework.

Mother has given me permission to go to a picnic.

वरील वाक्ये तुम्हाला भूतकाळातील वाटू शकतात. पण फरक हा आहे, की वरील वाक्यांमध्ये क्रिया भूतकाळात सुरु होऊन वर्तमानकाळात पूर्ण झाली. उदाहरणार्थ, तिसऱ्या वाक्यात विद्यार्थ्यांनी गृहपाठ आत्ता करून पूर्ण केला असा अर्थ प्रतीत होतो

आईने मला परवानगी दिली (mother gave me permission)” आणिआईने मला परवानगी दिली आहे (mother has given me permission)” ही वाक्ये तुम्ही नीट पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल दुसरे वाक्य हे तुम्ही वर्तमानकाळातील घटना दर्शविताना वापराल. अमेरिकन इंग्लिश पेक्षा ब्रिटिश इंग्लिश मध्ये present perfect tense चा जास्त वापर होतो.

4. Present Perfect Continuous Tense - चालू पूर्ण वर्तमानकाळ

जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरु होऊन वर्तमानकाळात देखील सुरु राहते, तेव्हा त्या क्रियेला present perfect continuous tense मधील क्रिया म्हणतात. म्हणजेच क्रिया अजून वर्तमानकाळात पूर्ण झालेली नाही, तर ती अजूनही सुरु आहे. उदाहरणार्थ

They have been living in Toronto since 9 years.

I have been taking karate classes.

It has been raining since 2 days.

He has not been listening.

वरील वाक्यांमध्ये क्रिया किंवा घटना भूतकाळात सुरु झाली आणि ती वर्तमानकाळात देखील सुरु आहे. या वाक्यांसाठी आपण मुख्य क्रियापदाच्या शेवटी ing बरोबरच have/has been वापरतो. वरील वाक्यांचा अर्थ असा होतो

ते वर्षांपासून Toronto मध्ये राहत आहेत.

मी कराटे शिकत आहे. (काही दिवसांपासून)

(तब्बल) दिवसांपासून पाऊस पडत आहे.

तो (खूपवेळे पासून) ऐकत नाही आहे.

Past Tense किंवा भूतकाळ

1. Past Simple Tense - साधा भूतकाळ

भूतकाळातील कृती किंवा परिस्थितीबद्दलएखाद्या घटनेबद्दल बोलण्यासाठी आपण past simple tense वापरतो. ही घटना लहान किंवा मोठी असू शकते. जसे –  

Steve wrote an email. 

We did not watch any movie yesterday.

She lived in Boston when she was young.

He reached in time.

Simple past tense मध्ये आपण मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप (म्हणजेच भूतकाळातील रूप) वापरतो. उदाहरणार्थ write चे wrote, live चे lived आणि reach चे reached. नकारार्थी वाक्यांसाठी मात्र मुख्यक्रियापदाच्या आधी did not वापरले जाते (did हा do चा भूतकाळ आहे). जसे – We did not watch (आम्ही पाहिले नाही). They did not come (ते आले नाहीत). She did not like it (तिला ते आवडले नाही).

2. Past Continuous Tense - चालू भूतकाळ

चालू भूतकाळातील क्रिया किंवा घटना म्हणजे अशी क्रिया किंवा घटना जी भूतकाळात घडत होती आणि ती त्यावेळेस पूर्ण झालेली नव्हती. उदाहरणार्थ –  

My mother was making pancakes for us.

The kids were playing in the garden.

Grandma was watching her favourite serial.

His neighbour’s dog was barking.

भूतकाळात घडत असणाऱ्या, अपूर्ण घटनेचे वर्णन करताना आपण हा काळ वापरतो. जसं “My mother was making pancakes” मध्ये असा अर्थ प्रतीत होतो, की आई पॅनकेक्स बनवत होती, पण ते बनवून पूर्ण झाले नव्हते. या वाक्यांमध्येही मूळ क्रियापदाला ing लागते; पण मूळ क्रियापदाच्या अगोदर was / were (म्हणजेच to be चा भूतकाळ) असते.

3. Past Perfect Tense - पूर्ण भूतकाळ

भूतकाळात सुरु होऊन पूर्ण झालेल्या क्रियेला किंवा घटनेला आपण पूर्ण भूतकाळातील घटना म्हणू शकतो. थोडक्यात सांगायचं तर भूतकाळातील भूतकाळ असं आपण या काळाला म्हणू शकतो. याचं मराठी उदाहरण म्हणजे – “आम्ही काल साडेनऊ वाजता स्टेशन वर पोहोचलो, पण ट्रेन आम्ही पोहोचायच्या आधीच, ९ वाजताच निघून गेली होती”. अजून एक मराठी उदाहरण पाहू: “सोमवारी वर्गात सूचना आली तेव्हा (आधीच) आमचा पेपर सोडवून झाला होता”. आता खालील इंग्लिश उदाहरणांचा अभ्यास करा –  

We had seen a beautiful castle in Germany. 

आम्ही जर्मनी मध्ये सुंदर राजवाडा पाहिला होता.

He thought he lost, but in reality he had won the competition. 

त्याला वाटले तो हरला, पण प्रत्यक्षात त्याने स्पर्धा जिंकली होती.

Her father had baked a very beautiful cake on her birthday. 

तिच्या वडिलांनी तिच्या वाढदिवशी खूप सुंदर केक बनवला होता.

They had never seen such a thing before. 

यापूर्वी त्यांनी असे कधीही पहिले नव्हते.

अधोरेखित शब्दांमागील व्याकरणाचा नीट अभ्यास करा. Past Perfect मध्ये आपण मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो. (आता पहिले रूप, दुसरे रूप म्हणून गोंधळून जाऊ नका! याविषयावर एक सविस्तर लेख आपण पुढे वाचूच. पण इथे उदाहरण म्हणून बघू, की see या मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप आहे saw आणि तिसरे रूप आहे seen.) तसेच मुख्य क्रियापदाच्या अगोदर had (have चा भूतकाळ) वापरतात.

4. Past Perfect Continuous Tense - चालू पूर्ण भूतकाळ

Past Perfect प्रमाणेच भूतकाळातील भूतकाळ व्यक्त करणारा हा आणखी एक काळ आहे. एखादी गोष्ट भूतकाळात दीर्घकाळासाठी घडत असेल, तर अश्या घटनेचे वर्णन आपण Past Perfect Continuous मध्ये करतो

It had been raining all day.

He had been sitting there for more than two hours.

She had been living with her in-laws.

We had been waiting for very long at the station.

वरील वाक्यांमध्ये आपण मुख्य क्रियापदाच्या शेवटी ing बरोबरच मुख्य क्रियापदाच्या आधी had been वापरतो. वरील वाक्यांचा अर्थ असा होतो

दिवसभर पाऊस पडत होता.

तो तिथे २ तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहिला होता.

(तेव्हा) ती तिच्या सासरी राहत होती.

आम्ही बराचवेळ स्टेशन वर वाट पाहत थांबलो होतो.

Future Tense किंवा भविष्यकाळ

1. Future Simple Tense - साधा भविष्यकाळ

जेव्हा आपण एखादी घटना भविष्यात घडेल असे सांगतो किंवा भाकीत करतो तेव्हा आपण साधा भविष्यकाळ वापरू शकतो. आपण जेव्हा भविष्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण अश्या घटनेबद्दल बोलतो जी आत्तापासून ५ मिनिटानंतर किंवा अगदी ५० वर्षानंतरदेखील घडणारी असू शकते. Future simple tense मधील खालील उदाहरणे पहा –

He will call John tomorrow.

I am sure she will score good marks.

She will help you.

They will be in Paris next week.

Future simple tense मध्ये मुख्य क्रियापदाच्याआधी will वापरतात. वरील वाक्यांचा अर्थ असा होतो

तो जॉनला उद्या कॉल करेल.

मला खात्री आहे, तिला चांगले मार्क्स मिळतील.

ती तुला मदत करेल.

ते पुढच्या आठवड्यात पॅरिस मध्ये असतील.

2. Future Continuous Tense - चालू भविष्यकाळ

चालू भविष्यकाळातील क्रिया किंवा घटना म्हणजे अशी क्रिया किंवा घटना जी भविष्यकाळात घडत असेल आणि ती त्यावेळेस पूर्ण झालेली नसेल. उदाहरणार्थ –  

She will not receive calls. She will be working around 12:00 pm.

ती कॉल्स घेणार नाही. ती दुपारी १२च्या सुमारास काम करत असेल.

He will be driving (then).

तो (तेव्हा) गाडी चालवत असेल.

They will be watching a play tomorrow at this time.

उद्या या वेळी ते एक नाटक पाहत असतील.

When we reach home, the children will be studying.

जेव्हा आम्ही घरी पोहोचू, तेव्हा मुले अभ्यास करत असतील.

भविष्यात एका विशिष्ट वेळेला काय घडत असेल हे सांगण्यासाठी आपण हा काळ वापरतो. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल, Future continuous मध्ये मुख्य क्रियापदाला ing लागते आणि क्रियापदाच्या सुरुवातीला will be असते.

3. Future Perfect Tense - पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा आपल्याला भविष्यात एखादी गोष्ट घडून गेली असं सांगायचं असेल, किंवा भविष्यातील एखादी क्रिया/घटना घडून पूर्ण झाली असं सांगायचं असेल, तेव्हा आपण पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच future perfect tense वापरतो. भविष्यातील भूतकाळ असा काहीसा हा काळ आहे. खालील उदाहरणे पहा –

Tomorrow you can call me around 11 am. I will have arrived at the office by then. 

तुम्ही मला उद्या सकाळी ११ च्या सुमारास कॉल करू शकता. त्यावेळेस मी ऑफिसमध्ये पोहोचलो असेन.

Children will have finished their homework before the exam.

मुलांनी परीक्षेच्या आधी त्यांचा गृहपाठ पूर्ण केलेला असेल.

He will have prepared the presentation before Monday. 

त्याने सोमवारच्याआधी प्रेसेंटेशन तयार करून ठेवलं असेल.

She will have visited India in May.

मे महिन्यात तिने भारताची भेट घेतलेली असेल.

एव्हाना तुम्हाला अधोरेखित शब्दांमागचं व्याकरण कळायला लागलंच असेल. Future Perfect मध्ये आपण क्रियापदाचं तिसरं रूप आणि क्रियापदाच्या आधी will have वापरतो.

4.Future Perfect Continuous Tense - चालू पूर्ण भविष्यकाळ

Future perfect continuous मध्ये आपण भविष्यात सतत, दीर्घकाळासाठी घडत आलेल्या क्रियेबद्दल बोलतो.

By 2023 he will have been working in this company for 10 years.

२०२३ मध्ये तो या कंपनीत १० वर्षांपासून काम करत आलेला असेल.

In September she will have been pursuing her master’s.

सप्टेंबरमध्ये ती मास्टर्स करत असेल.

By the time we reach the stadium, they will have been playing for 3 hours.

ज्यावेळी आपण स्टेडियम वर पोहोचू, ते तासांपासून खेळत असतील.

He will have been studying all day for the exam.

तो दिवसभर परीक्षेसाठी अभ्यास करत असेल.

वरील वाक्यांमध्ये आपण मुख्य क्रियापदाच्या शेवटी ing बरोबरच मुख्य क्रियापदाच्या आधी will have been वापरतो.

नव्याने इंग्लिश शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या काळांचा अभ्यास करावाच लागतो. आणि सुरुवातीला थोडं गोंधळून जाणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे काळांच्या नावापेक्षा त्यामागची concept समजून घ्यायचा प्रयत्न करा. दिलेल्या उदाहरणांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा. तुम्हाला हवे असल्यास यातल्या प्रत्येक काळावर आपण एक स्वतंत्र लेख लिहू आणि सरावासाठी अजून उदाहरणे पाहू.          

सगळ्यात शेवटी एकच सांगेन वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर पुढे जाल.

All the Best!