इंग्लिश शिकण्यासाठी बेस्ट टिप्स | Best Tips for Learning English

कमीतकमी वेळात उत्तम इंग्रजी कसं शिकायचं? इंग्रजी शिकायचं म्हणजे नक्की सुरुवात कुठून करायची किंवा step by step इंग्रजी कसं शिकायचं ? हे असे प्रश्न तुम्हाला ही पडतात ना? म्हणूनच या article मध्ये मी तुमच्याबरोबर share करणार आहे अश्या टिप्स ज्या तुम्हाला लवकरात लवकर उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. 

कुठलीही भाषा शिकताना दोन गोष्टी आपल्याला जमल्या की ती भाषा आलीच म्हणून समजा. त्या दोन गोष्टी म्हणजे मुबलक शब्द संग्रह आणि व्याकरण. जस जसा शब्द संग्रह समृद्ध होत जातो तस तसा तुमचा confidence ही वाढत जातो. आणि व्याकरणातल्या काही महत्वाच्या भागांचा अभ्यास केला की वाक्य रचना जमते. म्हणूनच या दोन्ही गोष्टी equally important आहेत!

इंग्रजी शिकण्यासाठी ग्रामर शिकावंच लागतं का?….वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

एका महिन्यात इंग्रजी शिका … वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

इंग्लिश शिकताना जी छोट्यातली छोटी गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे ती आपण बघणार आहोतच शिवाय ज्या गोष्टी तुम्ही केल्या नाही पाहीजेत आणि का केल्या नाही पाहीजेत हेही आपण सविस्तर पणे बघणार आहोत. 

चला तर मग सुरुवात करूया. 

१. Ask yourself, “Why do I want to learn English?" :

कुठलीही भाषा शिकताना तुम्ही सगळ्यात आधी  हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा की तुम्हाला ती भाषा का शिकायची आहे? जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे तर ते का शिकायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या डोक्यात clear असायलाच हवं.

इंग्लिश मध्ये Interview द्यावा लागणार आहे म्हणून? Self confidence वाढवायचाय म्हणून? परदेशात जायचंय मग इंग्लिश शिकावं लागणारच म्हणून?

तुमचं उत्तर काहीही असो सगळ्यात आधी तुमचा ‘why‘ clear असायला हवा! हे उत्तर तुम्हाला तुमच्या इंग्रजी शिकण्याच्या प्रवासात पावलोपावली प्रेरणा देत राहील. आणि तुमचा हा प्रवास easy होईल. 

एकदा तुमचा purpose स्पष्ट झाला की आता तुम्हाला कृतीला सुरुवात करावी लागेल. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी Listening, Reading ,Writing आणि Speaking या चारही गोष्टी अंमलात आणाव्याच लागतात हे आपल्या प्रत्येकाला माहीतच आहे. म्हणूनच आता हे लक्षात घेऊया की या गोष्टी करताना कुठल्या क्रमाने आणि कश्या कराव्यात. किंबहुना कुठल्या चुका टाळाव्यात. 

२. Listening :

इंग्लिश शिकण्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे Listening! म्हणजेच जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा इंग्रजी ऐकणे. ऐकण्यामुळे आपण जे शब्द मराठीत वापरतो त्या प्रतिशब्दांचं आकलन आपल्याला होत जातं आणि त्यामुळेच आपला शब्द साठा समृद्ध व्हायला मदत होते. पण आता इंग्लिश ऐकायचं म्हणजे नेमकं काय करायचं? English ऐकायचं म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये interest आहे अश्या सर्व गोष्टी इंग्रजी मध्ये ऐकायच्या. तुम्हाला जर YouTube वर recipes बघायला आवडत असतील तर त्या इंग्लिश मधून ऐकायच्या,बघायच्या. जर चित्रपट बघायला आवडत असतील तर इंग्रजी चित्रपट बघायचे. गाणी ऐकायला आवडत असतील तर इंग्रजी गाणी ऐकायची. 

आणि सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे तुमच्या आवडत्या व्यक्तिमत्वाचे किंवा कलाकारांचे इंग्लिश interviews बघायचे. 

हे interviews बघून हळूहळू तुमच्या लक्षात येईल, कमीतकमी शब्दांमध्ये खूप उत्तम इंग्रजी बोलता येतं. तसही जे शब्द आपण वापरणारच नाही आहोत असे advanced शब्द पाठ करण्याचा हट्ट काय उपयोगाचा? तुम्ही आत्ता जरी ते शब्द पाठ केले तरी सतत वापर न केल्यामुळे कालांतराने त्यांचा विसर पडत जातो. म्हणूनच सतत कानावर पडलेल्या शब्दांचा नेहमी सराव करण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास स्वतः वाक्य तयार करून ते रोजच्या बोलण्यात वापरण्याचा प्रयत्न करा. 

इंग्लिश गाणी ऐकणायचे फायदे : गाणी म्हणजेच संगीत हा मनोरंजनाचा भाग आहे. पण जेव्हा तुम्ही specifically इंग्लिश गाणी ऐकता तेव्हा एक तर तुमचं मनोरंजन होत असतंच त्याशिवाय इंग्लिश शब्द ही तुमच्या कानावर पडत असतात. त्यांचा उच्चर करण्याची योग्य पद्धत नकळत आत्मसात होत जाते. त्यानंतर हीच गाणी पाठ झाल्यानंतर हेच शब्द जे आपल्याला पूर्वी कठीण वाटायचे ते खूप easily उच्चारता येतातच शिवाय ते रोजच्या आयुष्यात वापरणं सुद्धा खूप सोपं होऊन जातं. मात्र गाणी ऐकताना तुम्हाला एक काम न विसरता करायचं आहे ते म्हणजे google वर जाऊन त्या गाण्याचं Lyrics एकदा नीट वाचायचं आहे. कारण शब्द ओळख नसल्यामुळे त्यातले बरेच शब्द आपल्याला कळत नाहीत आणि ते चुकीच्या पद्धतीने लक्षात ठेवणं महागात पडू शकतं. शिवाय सुरुवातीला सर्व इंग्लिश गाणी कळत नाही किंवा सर्वच गाणी ऐकायला आवडताहेत असंही होत नाही. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला आवडतील अश्या गाण्यांचा शोध घ्यावा लागेल.

३. Reading :

Reading म्हणजे वाचन. वाचनाचं महत्व आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे इंग्रजी वाचनाचे महत्त्व इथे discuss करण्यापेक्षा तुम्ही वाचन नक्की कसं केलं पाहीजे हे बघूया. 

वाचन करताना शब्दांचा उच्चार तुम्हाला तेव्हाच जमेल जेव्हा तुम्ही ते शब्द योग्य रीतीने कसे उच्चारायचे हे ऐकलं असेल. जर एखादा नवीन शब्द तुमच्या वाचनात आला तर लगेच त्या शब्दाचा उच्चार आणि अर्थ google वर तपासून बघा. पुस्तक वाचायचं, News Paper वाचायचा,की इंटरनेट वर जाऊन randomly कुठलंही आर्टिकल वाचायचं हे आधी ठरवून घ्या. आपल्याला English learning ची journey interesting करायची आहे boring नाही. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं तेच वाचण्यावर भर द्यायला हवा. तुम्हाला जर English News Paper वाचायला आवडत नसेल तर नका वाचू. वर्तमान पत्रातले शब्द शिकलो कि इंग्रजी आलंच असं माझं मत नाही. मुळात वर्तमानपत्रातले सगळेच्या सगळे शब्द आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरत नाही. आणि ते पाठ करायचं म्हटलं तरी लक्षात राहत नाहीत.वर्तमानपत्र वाचायचंच असेल तर त्यातले असे पान वाचा जे वाचताना तुम्हाला bore होणार नाही. पुस्तकांबद्दलही तेच. अशी पुस्तक वाचूच नका ज्यात तुम्हाला रस नाही. तुमच्या आवडीच्या विषयाची,गोष्टींची पुस्तकं वाचा.

मला विचाराल तर मी अक्षरशः ‘चंपक’ या लहान मुलांच्या मासिकाच्या मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही प्रति simultaneously वाचत असे. ‘चंपक’ एवढ्या करीता कारण त्यातल्या गोष्टी चालू घडामोडींशी मिळत्या जुळत्या असल्यामुळे रोज वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा, वाक्यांचा उत्तम सराव होत असे. तुम्हीही तुम्हाला आवडली तर ही trick आजमावून बघा!

४. Writing :

Writing करताना म्हणजेच लिखाण करताना सुरुवातीला जे शब्द किंवा वाक्य तुम्ही शिकला आहेत ती न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमची Vocabulary समृद्ध होईल जी तुमच्या आत्मविश्वासात भर टाकेल. आणि एकदा तुमच्याकडे पुरेसा शब्दसंग्रह झाला की मग आपोआपच वाक्यरचना करायला सोपं जाईल. सुरुवातीला जी वाक्यं तुम्ही दिवसभरात शिकला आहात ती रात्री झोपायच्या आधी न बघता वहीमध्ये लिहून काढा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल यातली बरीचशी वाक्यं तुम्ही सातत्याने दररोज बोलत असता. सतत च्या सरावामुळे ही वाक्यं तुमच्या लक्षातही राहतील शिवाय न बघता योग्य त्या ठिकाणी वापरता ही येतील. या संपूर्ण process मुळे तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल आणि लवकरच तुम्ही स्वतःची वाक्ये स्वतः तयार करून बोलायलाही लागाल! आता ह्या level ला येण्यासाठी किती वेळ लागेल हे ज्याच्या त्याच्या प्रयात्नांवर आणि चिकाटीवर अवलंबून आहे. त्यामुळे सातत्याने खंड न पडू देता practice करा, लवकरच confidently तुम्ही इंग्रजी बोलू शकाल हे नक्की!

५. Speaking :

Speaking practice ही दोन पद्धतींची असू शकते.- मनातल्या मनात आणि मोठ्याने. 

मनातल्या मनात बोलायचं म्हणजे नेमकं काय बोलायचं आणि स्वतःशीच बोलायचं तर काय बोलायचं ह्या प्रश्नामध्ये अडकलेलं मी बऱ्याच जणांना बघितलं आहे. “तुझं आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी” संत तुकारामांच्या अभंगातली ही ओळ तुम्हाला आठवतेय का? English शिकताना या ओळीची आठवण स्वतःच स्वतःला करून दिलीत तर तुमचा प्रवास सोपा होईल! ते कसं? सांगते! 

दिवसभरात जवळपास ६००० विचार आपल्या डोक्यात येत असतात. त्या ६००० पैकी जर कमीतकमी १०० विचार आपण इंग्रजीतून केले तर इंग्रजी बोलण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरजच भासणार नाही! अर्थात दुसऱ्या कोणाशी इंग्रजी मध्ये न बोलता तुम्हाला fluent इंग्लिश बोलता येईल, असं नक्कीच नाही म्हणायचंय मला! पण आपल्यापैकी अनेक जण जे मितभाषी आहेत किंवा इतरांच्या फार संपर्कात येत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःशीच english मध्ये बोलणं हा खूप सोपा आणि उत्तम पर्याय ठरू शकतो. ‘अरे बापरे! मला उशीर झाला उठल्या आज!’ पासून ‘खूप रात्र झाली आता झोपायला हवं’ पर्यंत अनेक सोपी वाक्य आपण रोजच्या रोज स्वतःशी बोललो तर जिभेला सवय होईलच शिवाय इतरांशी तीच वाक्य बोलताना भीती हि वाटणार नाही. तेव्हा हा प्रयत्न नक्की करून बघा. हळूहळू १००, मग २००, मग ३०० वाक्य तुम्ही सहज बोलायला लागाल!