Asking for directions। इंग्लिश मध्ये पत्ता कसा विचारायचा?

या topic मध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश मध्ये पत्ता विचारताना कुठले प्रश्न वापरायचे आणि त्याच बरोबर पत्ता सांगताना अचूक दिशा कशी सांगायची. 

Direction म्हणजे दिशा. 

‘डाय-रेक्-शन’ हा ब्रिटिश उच्चार आहे आणि ‘डिरेक्शन’ हा अमेरिकन उच्चार आहे 

त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही या शब्दाचा ‘डाय-रेक्-शन’ किंवा ‘डिरेक्शन’असा उच्चार करू शकता. 

पत्ता विचारताना आपल्याला अनोळखी व्यक्तीकडून त्याच्या मदतीची, वेळेची अपेक्षा असते. त्यामुळे कुठलाही प्रश्न विचारायच्या आधी “Excuse me” म्हणणं अपरिहार्य आहे. म्हणूनच कुठलाही प्रश्न विचारायच्या आधी, मदत मागण्या आधी Excuse me म्हणायला विसरू नका.  

पत्ता विचारणे म्हणजे Asking for direction.

पत्ता विचारताना ३ शक्यता उद्भवू शकतात. 

१. पहिली शक्यता म्हणजे तुम्हाला ज्या जागी जायचंय जसं की एखादे हॉस्पिटल,एखादी शाळा किंवा लग्न-सभागृह, अश्या ठिकाणचा पत्ता तुमच्या कडे आहे परंतु त्या  ठिकाणी जाण्यासाठीची योग्य दिशा किंवा रास्ता तुम्हाला माहित नाहीये अश्या वेळेला तुम्ही कोणकोणते प्रश्न विचारू शकता ते बघूया. 

  • Could you tell me where the city bank is? (येथे सिटी बँके ऐवजी तुमझला हव्या त्या जागेचे नाव तुम्ही घेऊ शकता.-Colony/hospital/school/college)

            ‘सिटी बँक’ कुठे आहे हे तुम्ही सांगू शकाल का? 

  • Do you know where the city bank is?

            सिटी बँक कुठे आहे तुम्हाला माहित आहे का?

  • How do I get to the city bank?

            मी सिटी बँकेला कशी जाऊ?

  • Do you know how to get to the city bank?

            सिटी बँकेला कसं जायचं हे तुम्हाला माहीत आहे का?

  • I am looking for this address. Could you please tell me how to get there?

            मी हा पत्ता शोधत आहे. तिथे कास जायचं तुम्ही सांगू शकाल का?

  • Where is the Season’s Mall, please?

             कृपया (सांगाल का?) सिझन मॉल कुठे आहे?

  • Where is the closest railway station? 

           सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन कुठे आहे?

  • Can you tell me the way to Andheri station?

          अंधेरी स्टेशन ला कसं जायचं तुम्ही सांगू शकाल का?

२. आता दुसरी शक्यता बघूया जिथे बरेचदा आपल्याला शंका असते कि आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत तो रास्ता बरोबर आहे ना? अश्या वेळेला इंग्लिश मध्ये किती आणि कोणत्या प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता ते बघूया. 

  • Is this the way to the Metro mall?

           हा रस्ता मेट्रो मॉल ला जातो ना?

  • Am I on the right road for the Metro mall?

           मेट्रो मॉल जाण्यासाठी मी रस्ता योग्य रस्त्याने चाललो आहे ना?

  • Is this the right way to Kalyan Station?

            हा रास्ता कल्याण स्टेशन(ला जाण्या)साठी योग्य आहे ना?

  • Should I take this road for the post office?

           पोस्ट ऑफिस ला जाण्यासाठी मी या रस्त्याने जावं का?

  • Is JB’s Cafe near here?

           जेबी’झ् कॅफे इथेच आहे का? 

३. बरेचदा आपल्याला अचानक एखाद्या पेट्रोल पंपावर जाण्याची किंवा मेडिकल स्टोर ची किंवा रेस्टॉरंट ची गरज भासू शकते. म्हणजेच अश्या जागांचा आपल्याला पत्ताही माहित नसतो आणि त्या जागाही माहित नसतात अश्या वेळेला अनोळखी व्यक्तीला इंग्लिश मध्ये नेमकं काय विचारायचं ते बघूया. 

  • I need to find an ATM. Can you help me?

            मला ATM ची गरज आहे. तुम्ही मदत करू शकाल का?

  • Do you know where the closest ATM is?

          सगळ्यात जवळचं ATM कुठलं आहे तुम्हाला माहीत आहे का?

  • Is there an Indian restaurant nearby?

            इथे जवळ कुठे भारतीय रेस्टॉरंट आहे का?

जर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ‘हो’ म्हणजेच ‘yes’ असं उत्तर दिलं तर ‘मी तिथे कसा जाऊ/कशी जाऊ” असं विचारण्याकरिता तुम्ही म्हणू शकता, How do I get there?

 

तर हे होते काही प्रश्न जे तुम्ही इंग्रजी मध्ये पत्ता विचारताना वापरू शकता. 

तरीदेखील काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर आम्हाला जरूर कळवा. 

तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाची आम्ही वाट बघत आहोत. 

 

Happy Learning!