Lesson 2 : Vowels and Consonants
इंग्रजीतील स्वर व व्यंजनांची रंजक ओळख
या पाठात तुम्ही शिकाल:
Vowels कोणते आणि Consonants कोणते हे सहज ओळखणे व लिहिणे.
Notes : Lesson 2 - Vowels And Consonants explained in Marathi
स्वर म्हणजे अशी अक्षरे जी स्वतंत्रपणे उच्चारली जाऊ शकतात. म्हणजेच स्वरांचा उच्चार करताना टाळू,ओठ, जीभ किंवा तोंडाचा कोणताही भाग एकमेकांना स्पर्श करत नाही.
म्हणजे, आपले ओठ, दात, जिभ,टाळू, – काहीच आवाजाला अडवत नाहीत. तोंडात कुठेही अडथळा येत नाही.
आवाज मोकळ्या आणि सरळ पद्धतीने तोंडातून बाहेर पडतो.
मराठी वर्णमालेप्रमाणे इंग्रजी अल्फाबेटमध्ये देखील अशी अक्षरे – असे letters आहेत, ते म्हणजे: a, e, i, o, u. म्हणून यांना आपण इंग्रजी स्वर म्हणतो. त्यांच्यासाठी “Vowels” असा शब्द आहे.
आणि उरलेले जे letters आहेत त्यांना अर्थातच म्हणतात व्यंजने. पण व्यंजनांसाठी इंग्रजी प्रतिशब्द आहे – Consonants.
So,
Vowels: a, e, i, o, u
Consonants : b,c,d,f,g,h,j,k,l,m,n,p,q,r,s,t,v,w,x,y,z
✍️ Practice Worksheet for Lesson2
प्रश्न 1:
खाली दिलेल्या इंग्रजी letters पैकी स्वर (Vowels) आणि व्यंजन (Consonants) वेगळे करा.
सूचना: स्वर एका रकान्यात, व्यंजन दुसऱ्या रकान्यात लिहा.
अक्षरे:
A B E G I K O R U W X
Vowels : | Consonants : |
प्रश्न 2 : खाली दिलेले शब्द वाचा आणि प्रत्येक शब्दात किती व कोणते Vowels तसेच Consonants आहेत ते लिहा.
कंसामध्ये उच्चार आणि मराठी अर्थ दिले आहेत.
Apple (ॲपल – सफरचंद) – __________
Tiger (टायगर् – वाघ) – __________
Book (बुक – पुस्तक) – __________
Elephant (एलीफन्ट – हत्ती) – __________
Sun (सन – सूर्य) – __________
💡 Answer Key
प्रश्न 1:
खाली दिलेल्या इंग्रजी letters पैकी स्वर (Vowels) आणि व्यंजन (Consonants) वेगळे करा.
सूचना: स्वर एका रकान्यात, व्यंजन दुसऱ्या रकान्यात लिहा.
अक्षरे:
A B E G I K O R U W X
Vowels : A, E, I, O, U | Consonants : B, G, K, R, W, X |
प्रश्न 2 :
खाली दिलेले शब्द वाचा आणि प्रत्येक शब्दात किती व कोणते Vowels तसेच Consonants आहेत ते लिहा.
कंसामध्ये उच्चार आणि मराठी अर्थ दिले आहेत.
Vowels | Consonants | |
Apple (ॲपल – सफरचंद) | 2- A, e | 2- p, l |
Tiger (टायगर् – वाघ) | 2 – i, e | 3- T, g, r |
Book (बुक – पुस्तक) | 1- o | 2- B, k |
Elephant (एलीफन्ट – हत्ती) | 2- E, a | 5- l, p, h, n t |
Sun (सन – सूर्य) | 1- u | 2- S, n |

Pingback: Lesson 1 : Learning the Alphabet – EnglishAbhyas